मौजे जट्टेवाडी येथे १२ ते १५ मार्च अखेर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2022

मौजे जट्टेवाडी येथे १२ ते १५ मार्च अखेर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           मौजे जट्टेवाडी (ता. चंदगड) येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे शनिवार दि १२ मार्च २०२२ ते मंगळवार दि १५ मार्च २०२२ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. श्री पांढरीदेवी मंदिरासमोर सालाबादाप्रमाणे हा भक्तीमय सोहळा पार पडणार आहे. तरी सर्व भाविकभक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ह. भ. प. गुरुवर्य भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ह. भ. प डॉ. विश्वनाथ पाटील आणि सदावरवाडी , हल्लारवडी भजनी मंडळाच्या सहकार्याने या या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून श्री सत्यनारायण महापूजा आणि श्री पांढरीदेवी अभिषेक सोहळ्याचे या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरवात होणार आहे. रविवारी मुहूर्तमेढ त्यानंतर ध्वजारोहण, आरती, भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन असा भरगच्च अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन पुढील संपूर्ण सप्ताह असणार आहे. अखेर मंगळवारी दि . १५ मार्चला काला कीर्तन होणार असून महाप्रसादाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment