करंजगाव येथील जवानाला आसाममध्ये वीरमरण - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2022

करंजगाव येथील जवानाला आसाममध्ये वीरमरण

नितेश महादेव मुळीक

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         भारतीय सैन्यात कार्यरत असलेला करंजगाव (ता. चंदगड) येथील जवान नितेश महादेव मुळीक (वय वर्ष २५) हे अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाला. ही घटना बुधवार (दि. ९) रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या दुःखद घटनेची माहिती त्याचे वडील महादेव मुळीक यांना लष्कर सेवेतील अधिकाऱ्यांनी कळवली. करंजगावसह चंदगड तालुका शोकसागरात बुडाला आहे. नितेश मुळीक यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करंजगावात आणले जाणार आहे. शासकीय इतमामात करंजगाव येथेच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आसाम येथील सीमेवर नितेश मुळीक हे कार्यावर असताना सीमेपलिकडून अतिरेक्यांनी जोरदार गोळीबार केला. यामध्ये नितेश हे शहीद झाले. नितेश हे आठ वर्षांपूर्वी मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. गेल्या एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. त्याची पत्नी सहा महिन्यांची गरोदर आहे. त्यांच्या पश्चात आई - वडील, पत्नी, भाऊ, काका, भावजय असा परिवार आहे.


No comments:

Post a Comment