चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात प्लास्टिक मुक्ती अभियान संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2022

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात प्लास्टिक मुक्ती अभियान संपन्न

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या परिसरात प्लास्टिक मुक्ती अभियान अंतर्गत स्वच्छता करताना स्वयंसेवक.


चंदगड /सी. एल. वृत्तसेवा

           येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रविवारी महाविद्यालय परिसरामध्ये आजादी का अमृत महोत्सवानिमित्त `प्लास्टिक मुक्त परिसर अभियान व श्रमदान मोहीम`  राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरातील सर्व प्लास्टिक संकलन केले. जवळपास 40 किलो प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आला व त्याची विल्हेवाट लावली. 

                त्याच प्रमाणे महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर कचरामुक्त करण्यात आला. परिसरातील झाडांना पाणी घालने, कुंपण करणे, त्याचप्रमाणे निंदणी व तनमुक्ती इ. कामे केली. प्रारंभी महाविद्यालयाचे अधिक्षक आर. आर. देशपांडे (गणेश) यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजना विषयी प्रबोधन करण्यात आले. तसेच दैनंदिनीच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष करून Not me but you या ब्रीदविषयी महत्त्व पटवून देण्यात आले. प्रकल्प अधिकारी व कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे समिती सदस्य डॉ. एन. के. पाटील व प्रा. ए. डी. कांबळे यांनीही विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, श्रमदान व सेवाभावाने विषयी संबोधित केले. यावेळी समिती सदस्य प्रा. आर. एस. पाटील, एस. बी. हासूरे व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार स्वयंसेवक अजय सतर्डेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment