हलकर्णी येथील जयभवानी सेवासंस्थेत रवळनाथ विकास आघाडीची सत्ता, विरोधकांचे पानिपत - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2022

हलकर्णी येथील जयभवानी सेवासंस्थेत रवळनाथ विकास आघाडीची सत्ता, विरोधकांचे पानिपत

 

भरमाना गावडा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील जयभवानी सेवासंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत  माजी सभापती भरमाना गावडा व सरपंच राहूल गावडा यांच्या नेतृत्वाखालील श्री ग्रामदैवत रवळनाथ विकास आघाडी ने १३ पैकी १३ जागा जिंकून विरोधकांचे पानिपत केले. या निकालाने संस्था स्थापनेपासून संस्थापक भरमाना गावडा यांची सत्ता पुन्हा एकदा आबाधित राहिली.

        सर्वसाधारण गटातून सरपंच राहूल( मष्णू) पाटील, रवळू केसरकर, गजानन पाटील,मारूती नाईक,राणबा नेसरकर,विनायक भातकांडे, भावकू मोरे,अशोक सावंत हे आठ उमेदवार, महिला राखीव गटामधून मनिषा मनोहर आवडण,वैजयंता विठ्ठल ल्हासे या दोन,अनुसूचित जाती जमाती मधून विठ्ठल कांबळे ,इतर मागास गटामधून मोहन सुतार भटक्या जाती जमाती मधून रमेश नाईक हे उमेदवार निवडून आले. एकूण २७२ पैकी २५८ सभासदांनी मतदनाचा हक्क बजावला. विजयी उमेदवारांची हलकर्णी येथे मिरवणुक काढण्यात आली.

No comments:

Post a Comment