बसर्गे येथील मराठी शाळेच्या नूतन इमारतीचे मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2022

बसर्गे येथील मराठी शाळेच्या नूतन इमारतीचे मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन

  

बसर्गे (ता. चंदगड) येथे प्राथमिक शाळेची नवीन बांधण्यात आलेली सुसज्ज इमारत

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      बसर्गे (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रविवार दि.२० मार्च रोजी सकाळी  ११.वाजता पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील व सांस्कृतिक सभागृहाचे  उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 

           यावेळी आम. राजेश पाटील, जि. प. अध्यक्ष राहुल पी. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजीराव पाटील, गोपाळराव पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिक्षण व अर्थ समिती सभापती रसिका पाटील, जि.प. सदस्य सचिन बल्लाळ, अरुण सुतार, संग्राम कुपेकर, प्रा. सुनील शिंत्रे, सभापती ॲड. अनंत कांबळे, उपसभापती मनिषा शिवणगेकर, पं. स. सदस्या विठाताई मुरकुटे, माजी सभापती शांताराम पाटील, यशवंत सोनार, जगन्नाथ हूलजी आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, विद्या पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment