साहित्य माणसाला जगायला शिकवते - अशोक दळवी, हलकर्णी महाविद्यालयात कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2022

साहित्य माणसाला जगायला शिकवते - अशोक दळवी, हलकर्णी महाविद्यालयात कार्यक्रम

अशोक दळवी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       आजच्या डिजिटलच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या जास्त  आहारी न जाता वेगवेगळ्या  पुस्तकांचे वाचन करा आणि  लिखाण करून व्यासंगी बना. ग्रामीण भागातील जनतेला ज्ञानविज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आपल्याला प्रादेशिक भाषेमधून ग्रंथ निर्मिती करावी लागणार आहे असे प्रतिपादन अशोक दळवी यांनी केले.
      गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत वाङ्मय मंडळाने  आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.वाङ्मय मंडळाचे प्रमुख प्रा. एच. के. गावडे यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. हलकर्णी महाविद्यालय खऱ्या अर्थाने गुणवंत व यशवंत विद्यार्थी घडवण्याचे काम करत असते असे मत जनता विद्यालय तुर्केवाडी चे मुख्याध्यापक पी. एन. यळ्ळूरकर यांनी केले. प्रा.अर्जुन पिठूक यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
        अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पी. ए. पाटील म्हणाले, खरं तर भाषा हे एक वर्तन असून एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात त्यामुळे तुमचीच भाषा तुम्ही समृद्ध करा. प्रा. आर. बी. गावडे यांनी मनोगतातुन विद्यार्थ्यांना साहित्याचे महत्त्व सांगितले. अशोक दळवी यांनी लिहलेली ट्रॅक्टर ड्रायव्हर ते एम. डी. आर. टी. हि स्वतःची संघर्षकथा व वसुंधरा कविता संग्रह ही पुस्तके त्यांनी महाविद्यालयाला भेट म्हणून दिली. 
          या कार्यक्रमाला मराठी विभाग प्रमुख डॉ. अनिल  गवळी, प्रा. एस. एम. शहापूरकर, प्रा. सी. एम. तेली, एन. एम. मोरे, एन. एम. कुचेकर, सुरेश कांबळे, जे. के. पाटील, अंकुश नौकुडकर, सुवर्णा पाटील, ज्योती उत्तुरे, गीतांजली पाटील, सुषमा सुभेदार, मनोहर कांबळे व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा. शाहू गावडे यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रा. एन. पी. पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment