कालकुंद्रीमध्ये मंगळवारी 'अखंड नाम सप्ताहाची' समाप्ती व महाप्रसाद - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2022

कालकुंद्रीमध्ये मंगळवारी 'अखंड नाम सप्ताहाची' समाप्ती व महाप्रसाद

कालकुंद्री येथील ग्रामदैवत 'श्री कल्मेश्वर'


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर चा ९३ वा 'अखंड नाम सप्ताह' मंगळवार दि. ८ मार्च रोजी सुरू झाला होता. याची सांगता उद्या मंगळवार दि. १५ मार्च रोजी होत आहे. 

          सात दिवस 'सांब सदाशिव सांब हरहर सांब सदाशिव सांब' च्या अखंड नामघोषात भक्तिमय वातावरणात व भाविकांच्या अमाप उत्साहात साजरा झालेल्या महाराष्ट्रातील एकमेव वैशिष्ट्यपूर्ण सप्ताहाची समाप्ती उद्या सूर्योदयास होणार असून सकाळी नऊ वाजेपर्यंत पालखी प्रदक्षिणा तर १० ते सायंकाळी ४ पर्यंत महाप्रसादाचे वाटप होणार आहे.  रात्री १० वाजता सावर्डे, (ता. कागल) येथील आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संगीत सोंगी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. 

          दरम्यान दि. १३ ते १६ रोजी 'अखंड नाम सप्ताह' निमित्त कब्बडी खेळाडू व शौकिनांसाठी कालकुंद्री प्रो- लीग स्पर्धांचे आयोजन केले आहे.  सात तुल्यबळ संघांचा सहभाग असलेल्या स्पर्धेतील थरारक डोळ्यांचे पारणे फेडणारे सामने कबड्डी व क्रीडा शौकिनांसाठी पर्वणी ठरत आहेत.

No comments:

Post a Comment