चंदगड अर्बनच्या सभासदांना लाभांश वाटप करणार, पत्रकार परिषदेत संचालक मंडळाची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2022

चंदगड अर्बनच्या सभासदांना लाभांश वाटप करणार, पत्रकार परिषदेत संचालक मंडळाची माहिती

चंदगड येथे चंदगड अर्बन बँकेतील पत्रकार परिषदेवेळी उपस्थित चंदगड अर्बन बँकेचे संचालक व सभासद.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           रिझर्व्ह बॅंकेने पासुन बँकेवर निर्बंध लादल्यामुळे डिव्हीडंड वाटपास परवानगी नव्हती. नफा मिळाल्यानंतर सुध्दा निर्बंध असल्यामुळे रिझर्व बँकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. सन २०१८ पासुन सर्व सभासदांना डिव्हीडंड देता यावा, या उद्देशाने संचालक मंडळाने रिझर्व बँकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून व समक्ष पाठपुरावा करून परवानगी मागितली होती. त्यास यश मिळुन सन २०२१ च्या झालेल्या निव्वळ नफ्यातुन सभासदांना डिव्हीडंड वाटप करण्यासाठी रिझर्व बँकेने परवानगी दिल्याची माहिती चंदगड अर्बनचे अध्यक्ष दयानंद काणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

          डिव्हीडंडची रक्कम सर्व सभासदांचे सेव्हिंग्ज खातेवर जमा करणार आहोत. लाभांश जमा होणेसाठी  सभासदांनी बँकेमध्थे सेव्हिंग्ज खाती सूरू करावीत असे आवाहनही संचालक मंडळाने केले आहे. प्रारंभी  सीईओ अरूण चौगुले यांनी करून बँकेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.

           २०१५साली सभासदांनी बँकेची जबाबदारी आमच्या सोपविली  संचालक मंडळाने कर्मचार्याच्या सहकार्याने बँकेच्या कामकाजामध्ये वाढ करून बँकेच्या प्रगती करून  तोटा भरून काढला. मार्च २०१८ रोजी बँकेस १ कोटी १ ९ लाख ४० हजार इतका भरघोस नफा झाला. त्यामुळे सर्व तोटा भरून काढला, त्यामुळेच बँकेच्या प्रगतीची घोडदौड सुरू झाली. मार्च २०२१ अखेर बॅकेचे शेअर्स भांडवल ४ कोटी १३ लाख ४३ हजार इतके होवुन ठेवी रू. ७६ कोटी १ ९ लाख १८ हजार व कर्जवाटप ४७ कोटी ७० लाख ६५ हजार इतके करून बँकेस निव्वळ नफा ३८ लाख २४ हजार इतका मिळविलेला आहे. सन २००६ पासुन बँकेला निर्बंध लादल्यामुळे डिव्हीडंड वाटपास परवानगी नव्हती व नफा मिळाल्यानंतर सुध्दा निर्बंध असल्यामुळे रिझर्व बँकेची परवानगी घेणे आवश्यक होते. सन २०१८ पासुन सर्व सभासदांना डिव्हीडंड देता यावा या उद्देशाने संचालक मंडळाने रिझर्व बँकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून  परवानगी मागितली होती. त्याला यश मिळुन सन २०२१ च्या झालेल्या निव्वळ नफ्यातुन सभासदांना लाभांश वाटप करण्यासाठी रिझर्व बँकेने दि. १०.०३.२०२२ च्या पत्रानुसार लेखी परवानगी दिलेली आहे. सदर लाभांश ची रक्कम सर्व सभासदांच्या सेव्हिंग्ज खात्या लवकरच जमा करणार आहे. हा लाभांश जमा होणेसाठी सभासदांची बँकेकडे सेव्हिंग्ज खाती चालु असणे गरजेचे आहे. 

             ज्या सभासदांची बँकेकडे खाती नाहीत किंवा बंद पडलेली आहेत. अशा सर्व सभासदांची आपली खाती अदयावत करून घ्यावीत म्हणजे त्यांचा डिव्हीडंड त्यांचे खात्यावर वर्ग करणे सोईचे होईल. आर्थिक निर्बंधामुळे सन २००६ नंतर बँकेचे सभासद डिव्हीडंड पासुन वंचित राहीलेले होते. त्यांना आता मार्च २०२१ पासुन डिव्हीडंड मिळणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे देव रवळनाथाची बँकेवर असणारी कृपादृष्टी व आतापर्यंत सभासदांनी दाखविलेला संयम सर्व सभासद, ठेवीदार, हितचितंक यांनी बँकेवर ठाकलेला विश्वास व केलेले सहकार्य यामुळे शक्य झालेले आहे. आजपर्यंत सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांनी बॅकेवर विश्वास दाखविलेला आहे व सहकार्य केलेले आहे. तसेच येथुन पुढे बँकेवर व बँकेच्या संचालक मंडळावर विश्वास दाखवुन सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले. आभार उपाध्यक्ष बाबु बाळा हळदणकर यांनी मानले. यावेळी जि. प. सदस्य सचिन सदानंद बल्लाळ, संजय  ढेरे,  वैजाप्पा वाली,  अरूण पिळणकर, सुरेश सातवणेकर, सुनील देसाई, राजेंद्र परीट, विठ्ठल गोंधळी, शंकर  देशमुख, सौ. उर्मिला लक्ष्मण भातकांडे, सौ. संपदा भिसे, सदानंद  आवटे, सौ. चंद्रभागा पाटील, नौशाद अ. रशिद मुल्ला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment