कालकुंद्री येथे 'मी अक्षरयात्री' हस्ताक्षर दालनाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे मोहन गुरूनाथ कांबळे याने लेखन केलेल्या 'मी अक्षरयात्री' या हस्ताक्षर दालन प्रदर्शनाचे उद्घाटन चंदगड पंचायत समितीचे सभापती ॲड. अनंत कांबळे यांच्या हस्ते आज दिनांक १४ रोजी संपन्न झाले.
मोहन कांबळे हा स्वामी विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर येथे ग्राफिक डिझायनर कोर्सच्या पहिल्या वर्षात शिकत असून सुंदर अक्षराचे वरदान लाभलेल्या मोहन याने आपल्या कॅलिओग्राफी हस्ताक्षरातून प्रदर्शनाचे दालन सजवले आहे. केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सभापती कांबळे यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील, उपसरपंच संभाजी पाटील, जी. एस. पाटील, एम. बी. पाटील, पी. के. कांबळे, के. जे. पाटील, गावडू पाटील, गजानन पाटील, मित्र मंडळ व ग्रामस्थांची उपस्थिती होती. या वेळी सभापती व मान्यवरांच्या हस्ते अनोख्या उपक्रमाबद्दल मोहन कांबळे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. स्वागत व प्रास्ताविक मोहन कांबळे यांचे मार्गदर्शक सुभाष बेळगावकर (मुख्याध्यापक श्री सरस्वती विद्यालय यांनी केले).
हे प्रदर्शन आजच्या डिजिटल युगात हस्ताक्षर कसे असावे याचा एक वस्तुपाठ ठरेल. सुंदर अक्षरातून आपला छंद जोपासताना गेल्या तीन-चार वर्षात त्याने स्वहस्ताक्षरात लिहिलेले विविध साहित्य 'मी अक्षरयात्री' या प्रदर्शनाच्या माध्यमातून कालकुंद्री येथील 'श्री कलमेश्वर अखंड नाम सप्ताह'चे औचित्य साधून मांडले आहे. ते १६ मार्च अखेर सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment