होसुर येथील आम. भरमु सुबराव पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2022

होसुर येथील आम. भरमु सुबराव पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

होसुर येथील आम. भरमु सुबराव पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यी व शिक्षक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           होसुर (ता. चंदगड) येथील आम. भरमु सुबराव पाटील विद्यालयात मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक वैजनाथ कालकुंद्रीकर होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापिका सौ. अर्चना शिंदे, सचिव जी. टी. सुतार, कमलकांत पाटील, हणमंत पाटील उपस्थित होते.
         यावेळी इमेज इंटरनॅशनल रिसर्च सेटर कडून अध्यापक टी. एन. नाईक यांना पुरस्कार मिळाल्याबदल व अर्चना शिंदे यांचा सेवानिवृत्तीबद्दल संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कु. विद्या बिर्जे हिने कोरोना काळात शिक्षकांनी बहुमोल मार्गदर्शन केल्याचे सांगितले. तर पी. एम. नलवडे, व्ही. एस. नागरदळे, जे. जे. अतवाडकर, पी. आर. कांबळे , पी. एन. कालकुंद्रीकर आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी मुख्याध्यापक पी. एल. पवार यांनी केले. सुत्रसंचालन टी. एन. नाईक यांनी केले. तर आभार सौ. व्ही. एस. नागरदळे यांनी मानले.


No comments:

Post a Comment