शैक्षणिक कार्यातील योगदान म्हणजे पुण्याईचे काम - ना. सतेज पाटील केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड नवीन इमारतीचे दिमाखात उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2022

शैक्षणिक कार्यातील योगदान म्हणजे पुण्याईचे काम - ना. सतेज पाटील केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड नवीन इमारतीचे दिमाखात उद्घाटन

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
 शैक्षणिक कार्य हे एक पवित्र काम असल्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता प्रत्येकाने आपला वाटा उचलल्यास जिल्हा व राज्याची शैक्षणिक प्रगती शिखरावर पोहोचण्यास वेळ लागणार नाही. असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी व्यक्त केले. ते केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड च्या नूतन पाच खोल्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक या नात्याने बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण व अर्थ समिती सभापती रसिका पाटील होत्या.
स्वागत जि प सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण यांनी केले. प्रस्ताविक पांडुरंग जाधव यांनी केले. यावेळी पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले सुमारे ५८ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी या विभागाचे जि प सदस्य कल्लाप्पांना भोगण व विद्या पाटील यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यापुढील काळात चंदगडच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. केंद्र शाळा कोवाड येथे विद्यार्थ्यांची संख्या पाहता स्वच्छतागृह, मुतारी, शौचालय सुविधा अपुरी असल्याने त्यासाठी व संगणक साक्षरतेसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. कोरोनाची नवी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्यांनी लसीकरण किंवा दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी तो तात्काळ घ्यावा. असे आवाहन ना. पाटील यांनी आवर्जून केले. यावेळी जि प सदस्य विद्या पाटील, गोपाळराव पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तहसीलदार विनोद रणवरे, गोविंद पाटील, सरपंच अनिता भोगण, विद्याधर गुरबे, संभाजीराव देसाई- शिरोलीकर, मल्लिकार्जुन मुगेरी, 
उपसरपंच पुंडलिकराव जाधव, गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार, शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे, केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर, अशोकराव देसाई, शाळा समिती अध्यक्ष रामा यादव, मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील, विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी, तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
सुरुवातीस मान्यवरांची ग्रामपंचायत पासून केंद्र शाळेपर्यंत श्रीराम विद्यालयाचे लेझीम पथक, कैताळ- हलगी व  गावातील वारकर्‍यांच्या टाळ-मृदंग गजरातील दिंडी ने मिरवणूक काढण्यात आली. आभार भैरू भोगण यांनी मानले.


No comments:

Post a Comment