महापुरात बुडालेल्या वाचनालयासाठी पुस्तके देणार - पालकमंत्री ना.स सतेज पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2022

महापुरात बुडालेल्या वाचनालयासाठी पुस्तके देणार - पालकमंत्री ना.स सतेज पाटील


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 
सन २०१९ मध्ये कोवाड बाजार पेठेत आलेल्या प्रलयंकारी महापुरात येथील हजारो दुर्मिळ पुस्तकांनी सुसज्ज शिवनेरी वाचनालय पूर्णपणे बुडाले. यात वाचनालयातील अमूल्य पुस्तकांचे लाखोंचे नुकसान झाले. त्यामुळे कोवाड व परिसरातील वाचन चळवळीला मोठी खीळ बसली आहे. हे वाचनालय पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्धार कोवाड ग्रामपंचायतीने केला आहे. यास अनुसरून दि. २० मार्च रोजी कोल्हापूर चे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री महाराष्ट्र नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण, साहित्यिक पांडुरंग जाधव यांनी वाचनालयाचे नुकसान मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर पालकमंत्री यांनी वाचनालयाच्या पुनरउभारणीसाठी आपण पुस्तकांच्या रूपाने सहकार्य करू असे आश्वासन दिले. यावेळी जिप. शिक्षण सभापती रसिका पाटील, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षण अधिकारी सौ सुमन सुभेदार, शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे, सरपंच अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव सर्व सदस्य, केंद्र शाळा मुख्याध्यापक श्रीकांत पाटील आदींसह विविध खात्यांचे अधिकारी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment