कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
केंद्रशाळा कोवाड (ता. चंदगड) अंतर्गत येणाऱ्या मराठी विद्यामंदिर जकनहट्टी शाळेचा पहिलीतील विद्यार्थी शिवम सुभाष पाटील याच्या ६ व्या वाढदिवसानिमित्त शिवम च्या पालकांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्य व खाऊ देऊन वाढदिवस साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत सुबराव पाटील व अध्यापक विजय कल्लाप्पा पाटील यांच्यासह शिवमचे काका राजाराम ईश्वर पाटील व कुटुंबीय उपस्थित होते.
No comments:
Post a Comment