बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मोऱ्यांच्या दुरुस्तीबाबत निवेदन देताना ग्रामस्थ. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड ते शिरगाव फाटा व चंदगड ते हिंडगाव रस्त्याकडे जाणाऱ्या मोऱ्या मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्हीही सस्त्यावरील मोऱ्यांची मोठया प्रमाणात पडझड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी पावसाच्या अगोदर दोन्हीही मोऱ्यांचे बांधकाम करुन घ्यावेत. पावसाळ्यापूर्वी हे काम तातडीने करुन घ्यावे. जेणेकरुन येणाऱ्या पावसामुळे वाहनधारकांना याचा त्रास होणार नाही. अन्यथा मोऱ्याची स्थिती अशीच राहिल्यास येणाऱ्या पावसाळ्यात चंदगड शहराचा इतरांशी संपर्क तुटेल. निवदेन देतेवेळी नगरसेवक बाळासाहेब उर्फ आनंद हळदणकर, कलीम मदार, हनीफ सय्यद, गुलाब नाईकवाडी, बाळू फगरे, पार्लेचे सरपंच सुधाकर गावडे, श्री. चौगुले, समीर मुल्ला यासह चंदगड मधील नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment