रस्ता कामी भूसंपादन केलेल्यांचे मोबदलासाठी आमरण उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2022

रस्ता कामी भूसंपादन केलेल्यांचे मोबदलासाठी आमरण उपोषण

उपोषणाला बसलेले शेतकरी

 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
      चंदगड शहरातील बायपास रिंगरोड रस्त्यासाठी भूसंपादन केलेल्यां १६ जनांनी आपल्याला स्थानिक भावानूसार योग्य तो मोबदला द्यावा. यासाठी केलेल्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस होता. दुपारी चार वाजेपर्यंत कोणत्याही अधिका-यांनी उपोषणकर्त्यांची साधी विचारपूस केली नव्हती, की वैद्यकीय तपासणी ही करण्यात आली नाही असे सांगण्यात आले.
      चंदगड येथील पशुवैद्यकीय दवाखान्या जवळून शहराच्या बाहेरून चंदगड-तिलारीनगरला जाना-या रस्त्याला ब्राह्मण गल्लीच्या टोकाला हा बायपास- रिंगरोड मिळतो. दहा वर्षा दरम्यान या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. पण रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आजपर्यंत सोळा शेतकरी बांधवांपैकी  एकालाही मिळाला नाही. स्थानिक भावानूसार योग्य तो मोबदला मिळावा. यासाठी शेतकऱ्यांनी चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कार्यालय समोर अमरण उपोषण सुरू केले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी उपोषणकर्ते आपल्या निर्णयावर ठाम होते. सतीश सबनीस, आशिष कुतीन्हो, लक्ष्मण भेंडूलकर, अनंत मुळीक, इस्माईल शेरखान, नियाज शेरखान, मुजीब शेरखान, शब्बीर सय्यद, सिध्देश्वर हरिज्वाळे, शिवाजी कुंभार,  सुरेश सातवणेकर इत्यादी सह सोळा शेतकरी बांधवांनी  शेत जमीनीच्या मोबदल्यात साठी सोमवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.




No comments:

Post a Comment