कोवाड महाविद्यालयात 'जागतिक महिला दिनी' कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2022

कोवाड महाविद्यालयात 'जागतिक महिला दिनी' कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव

 


कला महाविद्यालयात आयोजित महिला दिनाला उपस्थित महिला.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

 कोवाड (ता. चंदगड) येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन मोठया थाटामाटात संपन्न झाला .सचिव एम व्ही पाटील प्राचार्य व्ही. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉमर्सच्या प्रमुख   प्रा.शीतल मंडले होत्या. 

     कार्यक्रमांची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.प्रास्ताविक प्रा. प्रियंका कांबळे यांनी केले. परिचय प्रा. प्रभा पवार यांनी कले. उपस्थित  सर्व मान्यवरांच ग्रंथ भेट देऊन  स्वागत प्रा. शीतल मंडले, प्रा.व्ही एस साळुंके यांनी केले. ग्रामपंचायत  व्यवसायात  आणि  वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या रणरागिणीचा गौरव ग्रंथ भेट देऊन करण्यात आला. सौ. वर्षाराणी रामचंद्र पाटील (ब्युटीशियन) सौ. रंजना साळुंखे (आरोग्य विभाग), सौ. छाया जोशी (सरपंच)  सौ. संगीता द. सुतार  (सरपंच), सौ. भारती रा. सुतार (सरपंच), मलतवाडी, सौ. सुप्रिया  व्ही.ज्ञकांबळे (कागणी) सरपंच या महिला सरपंचाचे  सचिव एम. व्ही. पाटील यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी सौ. वर्षाराणी पाटील यांनी ब्यूटिशियन या व्यवसायात आपण काम करत आहे आणि त्यातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध केला आहे .त्यासाठी महिलांनी जिद्द आणि चिकाटीनं कामासाठी प्रयन्त करावे म्हणून उपदेश केला. तर   सौ.सुप्रिया कांबळे मार्गदर्शन करतांना म्हणाल्या , आजच्या महिला सर्व प्रांतात आपापले कार्य मोठ्या धाडसाने करत आहेत.सर्वच प्रांतात आता स्त्री वावरत असून ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत असल्याचे सांगीतले .

यावेळी क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल        तेऊरवाडीच्या स्वाती पाटील या विद्यर्थिनीच्या आई वडिलांचा सचिव एम व्हि.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषण प्रा.शीतल मंडले यांनी केले.आभार विजयमाला साळूंखे यांनी मानले . सूत्रसंचालन स्वाती पाटील यांनी केले. यावेळी विध्यार्थिनीची कार्यशाळा घेण्यात आली .यावेळी सर्व विभागातील प्राध्यापक सेवक विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम महिला विभागाने आयोजित केला होता.


No comments:

Post a Comment