मराठ्यांना संविधानाच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळवून देऊ - महिपती बाबर, मराठा सेवा संघाच्या ३३ कक्षांची हुपरी येथे सभा - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2022

मराठ्यांना संविधानाच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळवून देऊ - महिपती बाबर, मराठा सेवा संघाच्या ३३ कक्षांची हुपरी येथे सभा

 
मराठा सेवा संघाच्या हुपरी येथील सभेत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष महिपती बाबर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

  मराठा समाज हा पूर्वापार शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणजे कुणबी होय. त्यामुळे कुणबी हे इतर मागास प्रवर्गात येत असल्याने पर्यायाने संपूर्ण मराठा समाज हा इतर मागास म्हणजेच ओबीसी आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून त्याची आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज आहेे. यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नशील असून हेच आमचे ध्येय आहे. असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी केले. ते हुपरी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे हिरगुडे सभागृहात संपन्न मराठा सेवा संघ प्रणित ३३ कक्षांच्या सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आण्णाभाऊ साठे विश्व शाहिर परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

  स्वागत व प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव खाडे यांनी केले. पुढे बोलताना बाबर म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. पण ते संविधानातील तरतुदीप्रमाणेच हवे. अन्य मार्गांनी दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू शकत नाही. यातून समाजाची केवळ फसवणूक होत आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी १९९० पासून मराठ्यांच्या आरक्षणाबदलची भुमिका स्पष्ट करून जागृती केली आहे. भविष्यात हा लढा जोमाने लढण्यासाठी सज्ज व्हावे. आता मराठ्यांना आरक्षणाशिवाय तरणोपाय नाही! असे त्यांनी शेवटी सांगितले.  

      डॉ. राजीव चव्हाण यांनी अर्थ, प्रचार, प्रसारमाध्यम, शिक्षणसत्ता, राजसत्ता, सांस्कृतिक व धर्मसत्ता आदी सत्ता मराठ्यांनी काबीज कराव्यात असे आवाहन केले.

   यावेळी कोल्हापूर मनपाचे अभियंता चेतन आरमाळे यांची मराठा सेवा संघ जिल्हासचिव, ॲड. रणजित आरडे यांची जिल्हा सहसचिव, राजेंद्र रासम जिल्हा कोषाध्यक्ष तर जिल्हा प्रवक्ता तथा प्रसिद्धीप्रमुख पदी शहाजी देसाई (कडगाव, ता. भुदरगड) यांच्या निवडी करण्यात आल्या.

    विश्वशाहिर परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील, सहसचिव संजय रणदिवे, सहसचिव रणजीत आरडे, उपाध्यक्ष प्रशांत कुट्रे, प्रवीण पाटील, जिल्हा संघटक सुशांत निकम, उपाध्यक्ष सुरेश पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष भरत पवार, संभाजी ब्रिगेड शिरोळ नागेश काळे, संभाजी ब्रिगेड भुदरगड तालुकाध्यक्ष मानसिंग देसाई, मराठा सेवा संघ कोल्हापूर शहराध्यक्ष संजय काटकर , जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्ष डॉ जयश्री चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड शहर उपाध्यक्ष शिवमती काटकर आदींनी यावेळी मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षांची बांधणी व आरक्षणाबाबत मनोगते व्यक्त केली.

   याप्रसंगी शिक्षक परिषदेचे सचिव डी के देसाई, कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष गणपती राठोड , संजय मोरे हुपरी, गोवर्धन माने, सतीश माने, सुभाष जाफळे, सतिश भोसले, मधुकर बिरंजे, अजय सिंह भोसले, चंद्रकांत अडसूळ, शंकर बनछोडे, विष्णू बाबर आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचलन शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शहाजी देसाई यांनी केले. आभार जिल्हा उपाध्यक्ष विनायक लक्ष्मण पाटील यांनी मानले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हुपरी शहर अध्यक्ष प्रकाश बावचे, कार्याध्यक्ष प्रतापराव जाधव, सचिव धनाजी तळेकर, नागेश हवालदार, आदित्य खाडे, गौरव खाडे व अशोक खाडे यांनी परिश्रम घेतले.





No comments:

Post a Comment