चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
उत्साळी (ता. चंदगड) येथील विठ्ठल सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष संतोष सखाराम देसाई यांना दोन पेक्षा जादा अपत्ये असल्याने अपात्र घोषित करण्यात आले आहे .दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्या कारणावरून त्यांना अध्यक्ष पदावरून बडतर्फ करण्याचे आदेश सहकारी संस्था ( दुग्ध ) सहायक निबंधक डॉ . राजेंद्र देशमुख यांनी आदेश दिले आहेत . याबाबत संस्थेचे सभासद हणमंत देसाई व संतोष सावंत - भोसले यांनी तक्रार दिली होती . संतोष देसाई हे गेल्या दहा वर्षापासून विठ्ठल सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष असून त्यांना चार अपत्ये असल्याची तक्रार सहायक निबंधक यांच्याकडे पुराव्यानिशी करण्यात आली होती . त्यावर कोणत्याही प्रकारचा खुलासा देसाई यांच्याकडून करण्यात आलेला नाही . त्यामुळे अखेर त्यांना अपात्र घोषित करण्यात आले . यापूर्वी त्यांना याच निकषांवर घटप्रभा विकास सेवा संस्थेच्या अध्यक्ष पदावरून देखील अपात्र ठरवण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment