महादेवराव बी. एड. कॉलेज येथे स्वागत समारंभ संपन्न.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महादेवराव बी. एड. कॉलेज तुर्केवाडी येथे बी. एड प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दि. 3/2/2022 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष महादेवराव वांद्रे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महादेवराव वांद्रे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि, बी फार्मसी विभागाच्या प्रमुख प्रा. मनीषा सोहनी या होत्या.
'राष्ट्रनिर्मिती आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे 'असे प्रतिपादन प्रा. मनीषा सोहनी यांनी केले. तर अध्यक्ष महादेवराव वांद्रे यांनी समाजाच्या गरजा शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करणेसाठी व्यावसायिक शिक्षणाचे महत्व प्रतिपादित केले. सदर कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एन. जे.कांबळे यांनी नवागतांचे स्वागत करुन बी. एड प्रशिक्षणाची गरज व शिक्षकांची भूमिका विषद केली..
विभागप्रमुख प्रा. ग. गो. प्रधान यांनी प्रशिक्षणातून बहुआयामी शिक्षक निर्माण करणे काळाची गरज असून सकारात्मक दृष्टीकोन बी. एड. कोर्समधून तयार होईल असे मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक सपना देशपांडे, बी. फार्मसी प्राचार्य अमर पाटील, पॉलिटेक्निक विभागाचे प्राचार्य एस. पी. गावडे, कार्यालयीन प्रशासक एन. जी. पाटील, ग्रंथपाल व्ही. पी. गुरव, श्रीमती एम. जी कांबळे, सर्व शिक्षक वृंद, बी एड प्रथम व दि्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्रअध्यापक दत्तात्रय वरगावकर यांनी केले तर आभार छात्रअध्यापक प्रदीप कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्रअध्यापक राजू कोरवी यांनी केले.
No comments:
Post a Comment