बांबू लागवडीसंदर्भात कणेरी मठात मंगळवारी राज्यस्तरीय कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2022

बांबू लागवडीसंदर्भात कणेरी मठात मंगळवारी राज्यस्तरीय कार्यशाळा



चंदगड / प्रतिनिधी
एसआयआयएलसी' (SIILC) आणि 'जिओलाईफ ॲग्रीटेक इंडिया प्रा.लि.' यांच्या संयुक्त विद्यमाने 
बांबू लागवडीतील संधी, मार्केटिंग आणि मुल्यवर्धन अशा बांबू शेतीतील संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मंगळवार दि.२९ मार्च रोजी सकाळी ११.वाजता श्री सिध्दगिरी कृषी विज्ञान केंद्र,कणेरी मठ कोल्हापूर येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आली आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या हस्ते काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याअध्यक्षतेखाली होणार आहे. राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल  
हे मार्गदर्शन आहेत.यावेळी सिध्दगिरी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रवींद्र सिंग उपस्थित राहणार आहेत. ही कार्यशाळा शासकीय बांबू अभियान योजनेखाली असून शेतकरी बंधूना निशुल्क आहे. तरी सर्व शेतकरी बंधूंनी हजर राहण्याचे आवाहन चंदगड तालुका कृषी अधिकारी जगताप यांनी केले आहे.




 

No comments:

Post a Comment