तृतीयपंथी व्यक्तींसाठी २७ मार्च ते २ एप्रिल रोजी मतदार नोंदणी शिबिरे - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2022

तृतीयपंथी व्यक्तींसाठी २७ मार्च ते २ एप्रिल रोजी मतदार नोंदणी शिबिरे


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

 राज्यात तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीच्या विशेष सप्ताहाचे आयोजन दि. २७ मार्च ते २ एप्रिल दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्र निवडणूक विभागाने घेतला आहे.  ३१ मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षभरातील संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात अनेक तृतीयपंथीयांच्या नावांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही. त्याची लक्षपुर्ती या नोंदणीतून होणार आहे. 
मतदार नोंदणी वेळी भारत निवडणूक आयोगाने तृतीयपंथीयांसाठी दिलेल्या सवलती त्यांच्या निदर्शनास आणून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. या व्यक्तींशी सौहार्दाने वागणे, त्यांच्याकडे तृतीयपंथी असल्याबाबत कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करू नये अशा सूचना निवडणूक अधिकारी महाराष्ट्र व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर कडून देण्यात आली आहे. शिबिरांचे आयोजन व लाभ  घेण्याचे आवाहन गडहिंग्लज चे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व चंदगड चे तहसीलदार विनोद रणवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


No comments:

Post a Comment