समृदध जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन महत्वाचे - प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2022

समृदध जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन महत्वाचे - प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         “पश्चिम घाट जैवविविधतेने समृदध आहे. परंतु अलिकडे चोरटी शिकार, वृक्षतोड,नैसर्गिक आपत्ती यामुळे ही जैवविविधता धोक्यात येत चालली आहे. वाढते प्रदूषण आणि मानवी स्वार्थ यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. आजच्या काळात पश्चिम घाटातील समृदध जैवविविधतेचा वारसा जतन करून त्याचे संरक्षण व संवर्धन याची योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे." असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. ते प्राणिशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या प्रदर्शन व उपक्रमानिमित्त बोलत होते.

           समन्वयक प्रा. डॉ. के. एन. निकम यांनी अनेक पशु-पक्षी, प्राणी यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे मत व्यक्त केले. निसर्ग आणि मानव यांचे सहअस्तित्व लक्षात घेतले तरच दुर्मीळ प्रजातींचे संरक्षण शक्य असल्याची सोदाहरण माहिती दिली.

           यावेळी विद्यार्थ्यांनी निबंध, पोस्टर, चित्रकला व हस्तकौशल्याने पक्षांची घरटी तयार करण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिकांनी गौरवण्यात आले. कार्यक्रमास प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, प्रा. डॉ. एन. एस. मासाळ, प्रा. डॉ. डी. ए. मोरे, प्रा. आर. के. तेलगोटे, प्रा. डॉ. ए. पी. पाटील यांच्यासह विद्यार्थी व कर्मचा-यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा.सुरेखा कोळी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. मयुरी कांडर यांनी केले. प्रा. ज्योती सुर्वे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment