कोवाड आठवडी बाजार, लिलावात भाग घेण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2022

कोवाड आठवडी बाजार, लिलावात भाग घेण्याचे आवाहन



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        कोवाड (ता. चंदगड) येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारातील २०२२-२३ सालातील दिनांक १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील संपूर्ण वर्षाचा ग्रामपंचायत कडील आठवडा बाजार, रोजचा बाजार व बकरी बाजार वसुलीचा जाहीर लिलाव शनिवार दि. २६/३/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय कोवाड येथे होणार आहे. या लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन ग्राम विकास अधिकारी जी एल पाटील, सरपंच सौ अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव व कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.




No comments:

Post a Comment