कालकुंद्री येथील 'श्री कल्मेश्वर अखंड नाम सप्ताह' ८ ते १५ मार्च रोजी - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2022

कालकुंद्री येथील 'श्री कल्मेश्वर अखंड नाम सप्ताह' ८ ते १५ मार्च रोजी

 

कालकुंद्री येथील ग्रामदैवत 'श्री कलमेश्वर'

 कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

कालकुंद्री ता. चंदगड येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर चा 'अखंड नाम सप्ताह' मंगळवार दि. ८ मार्च रोजी सुरू होणार असून सांगता मंगळवार १५ मार्च रोजी होणार आहे.  'सांब सदाशिव सांब हरहर सांब सदाशिव सांब' च्या सात दिवस अखंड नाम घोषात साजरा होणारा संपूर्ण महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण सप्ताह आहे. 'अखंड नाम सप्ताहाचे' यंदा ९३ वे वर्ष आहे. ८ रोजी सूर्योदयाला आरंभ होऊन १५ रोजी सूर्योदय प्रसंगी सप्ताहाची समाप्ती होईल. समाप्ती रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत महाप्रसाद; तर रात्री १० वाजता सावर्डे, ता. कागल येथील आधुनिक संगीत सोंगी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

  सप्ताह काळात सात दिवस रोज दुपारी १२ ते ५ महिला भजनी दिंड्या व भजने, सायंकाळी ६  ते ८  हरिपाठ व ब्रम्हकुमारी यांचे प्रवचन, रात्री ९ ते १२ ज्योतीताई गरुड- चाकणकर (आळंदी, ता. खेड, जि. पुणे) यांचे कीर्तन, रात्री १२ ते पहाटे ५ परगावच्या दिंड्या भजनी मंडळांची भजने दिंड्या तथा जागर. सोमवार दि. १४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नवसाच्या मुलांची तुला (वजन करणे) कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी सप्ताह काळात श्री दर्शन व सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment