पर्यटन विकास आराखडा अभ्यास दौऱ्याचे उदघाटन; चंदगड तालुक्‍यात उत्सुकता - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2022

पर्यटन विकास आराखडा अभ्यास दौऱ्याचे उदघाटन; चंदगड तालुक्‍यात उत्सुकता

 

पाटणे येथे आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे उद्घाटन करताना मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
ग्रामपंचायत पाटणे (ता. चंदगड) व अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ग्रामवस्ती सर्वेक्षण व अभ्यास दौऱ्याचे उदघाटन ७ एप्रिल २०२२ रोजी  पार पडले. हा उपक्रम १० एप्रिल पर्यंत चालणार आहे. होली रोझरी चर्च पाटणे येथे सरपंच गणपतराव दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या हस्ते झाले.
 सभापती ॲड अनंत कांबळे यांच्या हस्ते फोटो पूजन झाले. प्राचार्य डॉ राजेंद्र कोळी यांनी स्वागत करून अभ्यास दौऱ्याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विविध पाच गटात विभागले असून हे गट १) स्थान नकाशा ,सर्व सोयीसुविधा व रस्ते नेटवर्क आणि जमीन वापर, २) पारंपारिक घरे व बांधकाम तंत्रज्ञानाचे आराखडे व स्थानिक कौशल्य. ३) शाळा, ग्रामपंचायत , आरोग्य केंद्र व मंदिराचे तपशीलवार नकाशे. ४) सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्तरावर व रोजगाराच्या संधींसह जीवन शैलीचा अभ्यास ५) ऐतिहासिक वास्तू, पर्यटन स्थळे व अभयारण्याचा पर्यावरणाच्या क्षेत्राशी संबंध याबाबत अभ्यास करून आराखडा तयार करणार आहेत. उद्घाटन प्रसंगी रोझरी चर्चचे फादर संतोष लोपेझ, वनपाल  दत्ता पाटील, पी ए आवळे, मुख्याध्यापक जोतिबा पाटील, एन जे लांडे आदींची उपस्थिती होती. अशा प्रकारचा उपक्रम चंदगड तालुक्यात प्रथमच होत असल्याने याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे.
 अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आराखडा व अहवालाचे प्रदर्शन शनिवार दिनांक ९ रोजी दुपारी १ वाजता रोझरी चर्च येथे आमदार राजेश पाटील, कोकण विभागीय आयुक्त विलास बाळाराम पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य राजेंद्र कोळी, प्रा सुनीलकुमार भोसले व प्रा अनुपमा सोनपितळे यांनी केले आहे.





No comments:

Post a Comment