पोलिसांच्या प्रयत्नातून कोवाड चौकीचे रूप पालटले, वाचा काय झाला आहे बदल...... - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2022

पोलिसांच्या प्रयत्नातून कोवाड चौकीचे रूप पालटले, वाचा काय झाला आहे बदल......

कोवाड पोलीस चौकी समोर बगीच्या साकारण्यासाठी परिश्रम घेणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

          चंदगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोवाड पोलीस दूरक्षेत्र चौकीचे येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या  परिश्रमातून रूप पालटले आहे.

         सुमारे पस्तीस वर्षापूर्वी बांधलेल्या औट पोस्ट इमारतीचे स्लॅब गळतीमुळे येथील अधिकारी व कर्मचारी पावसाळ्यात हैराण व्हायचे. तथापि गेल्या सहा सात वर्षात आलेल्या सपोनि बाजीराव कांबळे,  पी. सी. वाघ, पी. आर. गंपले, हवालदार जमील मकानदार, संभाजी जाधव यांनी पदरमोड करून लोकसहभाग व शासकीय अनुदानातून स्लॅबवर पत्र्याचे छप्पर घालणे, नवीन शौचालय, बाथरूम, पाण्याची व्यवस्था, आतील भागात नवीन टाइल्स, फर्निचर, बाह्यांग रंगरंगोटी आदी कामे करून घेतली होती.  

        सध्या कार्यरत असलेले पोलीस नाईक रामदास किल्लेदार, पोलीस कॉन्स्टेबल खुशाल शिंदे, अमोल देवकुळे होमगार्ड संजय कोळी या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य सांभाळत फावल्या वेळेत  चौकी समोर चिरेबंदी कठडे, बाहेरून आणलेली माती यासह बगीचा साकारून पोलिस चौकीचे रूप पालटवले आहे. सगळेच कर्मचारी केवळ ड्युटी बजावणारे नसतात, समाजभान जपणारेही असतात हे आपल्या कृतीतून येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. परिसरात हा कौतुकाचा विषय ठरला असून चंदगडचे पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी याबद्दल अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment