प्राचार्य डॉ. पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2022

प्राचार्य डॉ. पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार

 

बेळगाव येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य व्ही आर पाटील.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
 कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व इतिहास विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड) यांना नुकतेच आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव व हेल्थ ॲण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या वतीने  जिल्हा कमांडट अरविंद घट्टी यांच्या हस्ते पुरस्कार नुकताच बेळगाव येथे प्रदान करण्यात आला. 
    पाटील हे गेली २६ वर्ष कोवाड महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सीमाभागासह उत्तर कर्नाटकातील जनमानसात सत्यशोधक विचार बिंबवणाऱ्या 'राष्ट्रवीर' साप्ताहिकाच्या कार्यावर पीएचडी प्राप्त केली. गोवा मुक्ती संग्रामात बेळगाव जिल्ह्याचे योगदान यावर लघुसंशोधन प्रकल्प तर 'बेळगाव जिल्ह्यातील सत्यासोधक समाज' हे पुस्तक प्रकाशित् झाले आहे.  
       याशिवाय विविध कार्यशाळा व परिषदेतून केलेल्या मार्गदर्शनाची दखल पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली आहे. याकामी त्यांना संस्थाध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील व पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले. 


No comments:

Post a Comment