न्यायाधीश अमृत बिराजदार यांना चंदगड येथे मुदतवाढ - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2022

न्यायाधीश अमृत बिराजदार यांना चंदगड येथे मुदतवाढ

न्यायाधीश ए. सी. बिराजदार


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           जून २०१८ पासून सलग चार वर्षे चंदगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश म्हणून काम पाहणारे अमृत बिराजदार यांना चंदगड येथे आणखी एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे वकील व न्यायालयीन वर्तुळात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

        दि ०६/०४/२०२२ रोजी रात्री मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिनस्त महाराष्ट्रातील बदलीस पात्र असलेल्या सुमारे ११०३ न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले. तथापि न्यायमूर्ती ए. सी. बिराजदार यांना चंदगड येथेच आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.

न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांचा चंदगड वकील बार असोसिएशन च्या वतीने बिराजदार यांचे अभिनंदन करताना बार असोसिएशनचे पदाधिकारी.

           साधारणपणे दर तीन वर्षांनी न्यायाधीशांच्या बदल्या होत असतात. मात्र कोरोना आजाराची साथ व शासकीय धोरणामुळे गत वर्षी तीन वर्षे पूर्ण झालेल्या न्यायाधीशांना त्याच जागी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र यंदाही न्या. बिराजदार यांना मुदतवाढ मिळाल्याने त्यांच्या उत्कृष्ट कामाचा तो सन्मानच समजला जात आहे. या निमित्य चंदगड वकील बार असोसिएशन च्या वतीने बिराजदार यांचे अभिनंदन करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या या आदेशाने चंदगड न्यायालयीन वर्तुळात उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

          या मुदतवाढ आदेशाबाबत बोलताना न्यायमूर्ती बिराजदार यांनी "आपण न मागताच मा. उच्च न्यायालयाकडून चंदगड येथेच मिळालेली आणखी एक वर्षाची मुदतवाढ ही देव रवळनाथाची इच्छा व प्रसाद म्हणून स्वीकारत आहे."अशा शब्दात आपल्या भावना 'चंदगड लाईव्ह न्युज चॅनेल' च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्या. या निमित्ताने चंदगड न्यायालयात न्यायाधीश म्हणून सलग पाच वर्षे पूर्ण करणारे बिराजदार हे चंदगड न्यायालयाच्या इतिहासातील पहिले न्यायाधीश ठरले.

No comments:

Post a Comment