ज्योर्तिलिंग पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विनायक काणेकर,उपाध्यक्षपदी चंदगडकर बिनविरोध - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2022

ज्योर्तिलिंग पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विनायक काणेकर,उपाध्यक्षपदी चंदगडकर बिनविरोध


विनायक काणेकर

                                                                      संजय चंदगडकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
        'चंदगड येथील ज्योर्तिलिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती ए. एस. काटकर यांनी काम पाहिले. स्वागत व्यवस्थापक कन्हैया कुलकर्णी यांनी केले. सन २०२२-२७ या पाच वर्षासाठी संचालक मंडळ निवडण्यात आले. त्यामध्ये विनायक सुधाकर काणेकर, संजय कृष्णा चंदगडकर, गोपाळ कोकरेकर, उस्मान मुल्ला, शाम कोरगावकर, विनायक पाटील, तुकाराम कांबळे, महमदहनिफ शेरखान, हिरामणी हुंबरवाडी, सतिश वणकुंद्रे, श्रीमती रोहिणी पिळणकर, श्रीमती  मोरे, सुर्यकांत वाजंत्री यांची निवड करण्यात आली.अध्यक्षपदासाठी विनायक काणेकर यांचे नाव गोपाळ कोकरेकर यांनी तर उपाध्यक्षपदासाठी संजय चंदगडकर यांचे नाव सतिश वणकुंद्रे यांनी सुचविले. त्याला अनुक्रमे हिरामणी हुंबरवाडी व महमदहनिफ शेरखान यांनी अनुमोदन दिले. निवडप्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी एस. व्ही. सावंत होते. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चंदगड अर्बनचे चेअरमन दयानंद काणेकर, राजा नाईकवाडी, गुरूनाथ बल्लाळ, समीर नाईकवाडी यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment