रामपूर येथे पहिलीतील विद्यार्थांचा प्रवेशोत्सव. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
डुक्करवाडी (रामपूर) (ता. चंदगड) येथे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त साधण्यासाठी आज गुढीपाडव्यादिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा गोडवा वाढविण्यासाठी मिरवणूक काढुन १६विद्यार्थाचा प्रवेश निश्चित करण्यात आला.सकाळी मुख्याध्यापक राजेंद्र सुतार, सुरेखा चिंचणगी, अंगणवाडी सेविका मनीषा नाईक, कविता वर्पे आदींनी शाळेत गुढी उभारली.
या ज्ञान रूपी गुढीचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांना सजवून फेटे बांधून शाळेत पाठवले होते. यावेळी विद्यार्थ्यांची गावात ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे औक्षण करून शाळेत प्रवेश दिला. यावेळी अमित वरपे, लीला तुर्केवाडकर, दिलीप ढेरे, धीरज ढेरे, मनोज कांबळे, अर्जुन यरोळकर आदीसह पालक उपस्थित होते. खासगी शाळेत मिळणाऱ्या सेवा, सुविधा आणि ज्ञानदानामुळे जि. प. शाळेतील पटसंख्येबाबत मोठी चिंता व्यक्त होत असल्याने ग्रामीण भागातील शाळेतील वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जि. प. शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाला मोठा संघर्ष करावा करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून 'गुडीपाडवा, पट वाढवा' हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.
No comments:
Post a Comment