चंदगड येथे शुक्रवारी महाआरोग्य मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2022

चंदगड येथे शुक्रवारी महाआरोग्य मेळावा

 


 चंदगड/प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य सेवा व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत चंदगड ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार २२ एप्रिल रोजी सकाळी १० ते २ या वेळेत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ . बी . डी . सोमजाळ यांनी केले आहे . आरोग्य मेळाव्यात आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत युनिक हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे, याचा उपयोग शासनाच्या विविध आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी होणार आहे . मधुमेह , उच्चरक्तदाब , कॅन्सर , क्षयरोग यांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून निदान व उपचार , मोफत सर्व रोग निदान व उपचारामध्ये स्त्रीरोग तज्ञ , बालरोग तज्ञ , जनरल सर्जन डॉक्टर असून कान , नाक , घसा , नेत्ररोग चिकित्सा यावर तपासणी मोफत करण्यात येणार आहे . हेल्थ कार्डसाठी सोबत आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन येणे अनिवार्य आहे . आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होणार असून या मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा , असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ . सचिन गायकवाड , गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी केले आहे .




No comments:

Post a Comment