पोलीसांना निवेदन देताना महिला. |
चंदगड /प्रतिनिधी :-
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दोन महिलांचा विनयभंग केल्या प्रकरणी सरपंच राहुल गावडे याना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज हलकर्णी गावातील महिलांनी आज चंदगड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलीस निरीक्षक याना निवेदन देण्यात आले.गावातील एका लग्न हळदीचा कार्यक्रम आटोपल्यावर घरी जात असताना दोन महिलांना सरपंच राहूल गावडे यांनी हाताला धरून लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार करत विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. तसेच घडलेला प्रकार या महिलानी घरी सांगितल्यावर याबाबत विचारणा करण्यासाठी घरचे लोक गेले असता राहूल याच्या आई, भाऊ, वडील यांनीही शिव्या दिल्या. हलकर्णी गावचे प्रथम नागरिक म्हणून लायक नाहीत. यापूर्वी देखील गावातील तरुणांना व्यासनाच्या आहारी पडून गैरप्रकार, दादागिरी केल्याच्या तक्रारी आहेत.सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष पदावर अशा राहण्यास लायक नसल्याने गावडे याला अटक करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर शांता परशराम भोगण, रत्नाबाई कृष्णा नाईक, शांता राजाराम नाईक, सिंधू तुकाराम गुंडकल यांच्यासह बहुसंख्य महिलांच्या स्वाक्ष-या आहेत.
No comments:
Post a Comment