तालुका संघाची वार्षिक उलाढाल १००कोटी करणार-आम.राजेश पाटील आर्थिक वर्षात संघाला २कोटी ११लाख रूपये नफा - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2022

तालुका संघाची वार्षिक उलाढाल १००कोटी करणार-आम.राजेश पाटील आर्थिक वर्षात संघाला २कोटी ११लाख रूपये नफा

आमदार राजेश पाटील


चंदगड / प्रतिनिधी
      ,सभासद,ग्राहक,संचालक,कर्मचारी यांच्या योगदानामुळे संघाला आर्थिक वर्षात २ कोटी ११ लाखांचा नफा झाला असून संघाची वार्षिक उलाढाल ८१ कोटी झाल्याचे सांगून भविष्यात संघाची वार्षिक उलाढाल १०० कोटी करणार असल्याची माहीती संघाचे अध्यक्ष तथा आमदार राजेश पाटील यांनी दिली.
      शिनोळी (ता. चंदगड) येथील खत कारखान्यात चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी - विक्री संघाचे संचालक मंडळ व सर्व कर्मचारी यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.प्रारंभी व्यवस्थापक एस वाय पाटील यांनी स्वागत केले.
     यावेळी आमदार राजेश पाटील यानी तालुका खरेदी विक्री संघाची या वर्षाची ८१ कोटीची उलाढाल झाली असून संस्थेस २ कोटी ११ लाखांचा नफा झाल्याची माहिती दिली . गेल्या वर्षाची उलाढाल ७२ कोटीची . त्यात वाढ होऊन चालू वर्षात ८१ कोटीची उलाढाल असून , यामध्ये संचालक , सभासद , ग्राहक , कर्मचारी यांचे योगदान आहे . संघाने यापूर्वी दौलत डिझेल पंप हलकर्णी येथे तुलसी बझारसाठी इमारत बांधकाम केली असून तुर्केवाडी , तुडये येथे सुद्धा इमारत बांधकाम करण्याचे चालू आहे . संघाने २०२१-२२ या काळात उत्कृष्ठ कामगिरी करत असतानाच बँकेचे कर्ज पूर्णपणे भरणा करून बँकेत  ३ कोटी ५० लाखच्या ठेवी ठेवल्या आहेत . तसेच संस्थेचे नक्तमूल्य मंगील वर्षी ९ ४० लाख होते त्यात वाढ होऊन मार्च २०२२ अखेर १० ९ ० लाखापर्यंत झाले आहे . संस्थेच्या प्रगतीचा शासकीय स्तरावर विचार होऊन २०१६-१७ सालचा महाराष्ट्र राज्याचा सहकार भूषण व अटल महापणन  पुरस्कार दोन वेळा संघास देऊन गौरविण्यात आले आहे . तसेच संघाने उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल २०१८-२०१९ मध्ये महाराष्ट्र स्टेट को ऑप मार्केटींग फेडरेशन मुंबई व सन २०२१-२०२२ मध्ये झुआरी ॲग्रोकेमिकल लि . गोवा यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन संघाचा गौरव केला आहे . सभासदांना लाभांश रुपाने दरवर्षी ३ किलो येशेल वाटप केले . नागपंचमी , गणेशचतुर्थी , दसरा , दीपावली या सणानिमित्त १००० रुपयांचे खरेदीवर अर्धा किलो व २००० रुपयांच्या खरेदीवर एक किलो साखर मोफत दिली आहे . पुढील काळात संघाची उलढाल १०० कोटींच्यावर नेण्याचा आमचा मनोदय असल्याचे सांगितले.संघाच्या गेल्या वर्षाच्या कामकाजाचा आढावा व २०२०-२३ सालाचे नियोजन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
No comments:

Post a Comment