चंदगड तालूक्यात शालेय पोषण आहारात प्लास्टीक सदृष्य तांदूळ , शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2022

चंदगड तालूक्यात शालेय पोषण आहारात प्लास्टीक सदृष्य तांदूळ , शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

प्लास्टीक सदृष्य तांदळासंदर्भात जिल्हाधिकारी राहूल रेखावार याना निवेदन देताना शिवसेना प्रमुख विजय देवणे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

 चंदगड तालुक्यात शाळांमधील विद्यार्थ्यांना व स्तनदा आणि गरोदर महिलांना जाणारा मोफत पोषण आहारात प्लॅस्टीक सदृश्य तांदुळ भेसळ केला जातो आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधीत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना जिल्हा प्रमूख विजय देवणे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    मुरुकुटेवाडी या गावात चांगला व प्लास्टिक तांदुळ विभक्त केल्याचा सबळ पुरावा एका शाळेत निदर्शनास आला आहे. हा तांदुळ शिजवल्यानंतर अन्न पदार्थाची बाधा होऊन तांदुळ खालेल्ल्यांना त्रास होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. शालेय पोषण आहार वितरणात दिला जाणारा तांदुळ हा निकृष्ट दर्जाचा व कमी प्रतीचा व प्लास्टिक तांदुळ भेसळयुक्त आहे . शालेय पोषण आहाराच्या तांदुळाचा दर्जा तपासणारे आपले अधिकारी व ठेकेदार यांचे हितसंबंध असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत . म्हणून आपण या प्रकाराकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे . कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवेदनातून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.

 (१) मुरुकुटेवाडी तालुका चंदगड येथील तांदुळ व प्लास्टिक सदृश तांदुळ या भेसळ प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. (२) चंदगड तालुक्यातील शालेय पोषण व गर्भवती मातांना दिला जाणारा तांदुळ याच्या दर्जाची तपासणी व्हावी व ठेकेदार दोषी असल्यास त्याच्यावर नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा व ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात यावा. ( ३ ) शालेय पोषण व गर्भवती महिलांच्या आहार वितरणावर देखरेख करणारे आपले अधिकारी यांचेवर कारवाई व्हावी.



No comments:

Post a Comment