![]() |
किरण मगदूम |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचे कोल्हापूर जिल्हा अथलेटीक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत वल्लभ रामचन्द्र पाटील याने लांब उडीत प्रथम क्रमांक तर १०० मि. धावणेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. किरण संजय मगदूम याने उंच उडीत द्वितीय क्रमांक पटकवला.
या दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या खेळाडूंना प्रा. आर. टी. पाटील (क्रीडा संचालक) यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment