माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भोगोली येथे पशुवैद्यकीय शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2022

माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भोगोली येथे पशुवैद्यकीय शिबीर संपन्न

पशुवैद्यकीय शिबिरात जनावारांची तपासणी करताना डॉक्टर.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्राम भोगोली (ता. चंदगड) येथे मोफत पशु चिकित्सा शिबीर पार पडले. यावेळी गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे सहायक व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे व चंदगडचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परगने  यांनी 34 जनावरांची तपासणी करुन लसीकरण व औषधोपचार केले. 

        त्यानंतर ग्रामस्थ व स्वयंसेवकांना पशुधन व दुग्ध व्यवसाया संबंधी सुंदर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. साळुंखे म्हणाले की ``दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्याची जीवनदायीनी आहे. शेतकऱ्यांनी जनावरांचे चारा, पाणी, राहण्याची व्यवस्था व जोपासना याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. गाई- म्हशींना माणसांप्रमाणेच प्रेम द्यावे, वासरांचे उत्तम संगोपन करावे. लाल फुरसे तसेच साथीच्या विविध रोगांपासून जनावरांचे वेळीच रक्षण करावे. पशुधन हीच शेतकऱ्याची खरी संपत्ती आहे ती वाढविण्याचा निरंतर प्रयत्न करा. असे त्यांनी सर्वांना सुचित केले.`` प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील, प्रा डॉ. एन. एस. मासाळ, डॉ अंजली माने, स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment