चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
स्वामीकार पद्मश्री रणजित देसाई यांच्या 'बारी' कादंबरीवर आधारित दोन अंकी 'सबूद' या महानाट्याचा पहिला प्रयोग आज शुक्रवार दि. ८ एप्रिल २०२२ रोजी रात्री ९ वाजता श्रीराम विद्यालय रणजीत नगर कोवाड येथे संपन्न होत आहे.
रणजीत दादांच्या जयंतीनिमित्त मोफत प्रवेश असलेल्या या नाटकासाठी अत्याधुनिक डिजिटल रंगमंच, नेपथ्य, संगीत, दमदार संवाद यामुळे हे नाटक पाहणे एक नाट्य शौकीनांसाठी आयुष्यातील एक वेगळा अनुभव ठरणार आहे. महत्वाचे म्हणजे या नाटकाचे निर्माता-दिग्दर्शक, गीतकार, गायक, सर्व पात्रे ही आपल्या चंदगड तालुक्याच्या ग्रामीण खेडे गावातील कलाकार आहेत. या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन नाट्यसंस्कार मंडळ मुंबई व ताम्रपर्णी प्रतिष्ठान कोवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment