चंदगड : सी एल वृत्तसेवा
बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जयभीम तरुण मंडळ चंदगड यांच्यावतीने समाज मंदिर चंदगड या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
चंदगड अर्बन चे संचालक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकर देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गणित विषयाचे अद्यापक संदीप यल्लाप्पा कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ अलका देशमुख, नगरसेविका सौ नेत्रदीपा प्रमोद कांबळे, अभिजीत गुरबे, नगरसेवक सचिन नेसरीकर, दिलीप चंदगडकर, अनिल कट्टी , गोंधळे, प्रमोद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सॅमसन धूपदाळे, हरिष जाधव, सदानंद कांबळे, सौ अलका देशमुख, विद्यार्थी व चिमुकल्यांनी मनोगते व्यक्त केली.
सूत्रसंचालन संदीप कांबळे यांनी केले. आभार श्रीकांत कांबळे यांनी मानले. याकामी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment