'सबुद' महानाट्याच्या स्वागतासाठी कर्यात भाग सज्ज! शुक्रवार दि. ८ रोजी पाहिला प्रयोग - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2022

'सबुद' महानाट्याच्या स्वागतासाठी कर्यात भाग सज्ज! शुक्रवार दि. ८ रोजी पाहिला प्रयोग



 कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
 'स्वामी'कार पद्मश्री स्व. रणजित देसाई यांच्या तुफान गाजलेल्या 'बारी' कादंबरीवर आधारित (सुतकट्टीच्या 'बारी' तील बेरडांनी दिलेला....)  'सबूद'  महानाट्याचा रंगभूमीवरील पहिला प्रयोग रणजित देसाईंची जन्म व कर्मभूमी कोवाड, ता. चंदगड येथे त्यांच्या जयंतीदिनी शुक्रवारी ८ एप्रिल रोजी सादर होत आहे. प्रयोगाच्या स्वागतासाठी कोवाड नगरीसह कर्यात भाग सज्ज झाला आहे.
    श्रीराम विद्यालय कोवाड च्या क्रीडांगणावर दिनांक ८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता हा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित नाटक सादर होत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, परिसरात नोकरी, उद्योग, व्यवसाय निमित्य स्थाईक 'चंदगडी' चाकरमानी कलाकारांनी स्थापन केलेल्या 'नाट्यसंस्कार' मंडळाने या नाट्य कलाकृतीची निर्मिती केली आहे. उल्लेखनीय म्हणजे यातील सर्वच कलाकार चंदगड तालुक्यातील आहेत. नाट्यरूपांतर लेखक सना मोरे, निर्माता व गीतकार शिवाजी विष्णू पाटील (नागरदळे), संजय कृ. पाटील, संगीतकार विशाल बोरूले, पार्श्वगायक विजय बोराडे, डॉ नेहा राजपाल, संचिता मोरस्कर तर पार्शसंगीत आहे आनंद कुबल यांचे. नाट्य उभारणीत उद्योजक सत्तूराम मा. मणगुतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. 
यातील भुमिकांत महादेव पाटील, दयानंद सरवणकर, अमोल पाटील, शिवाजी वि. पाटील, शिवाजी द. पाटील, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, जकनू मुरकुटे, सुनील लोंडे, बामणे, सुप्रिया गावकर, साक्षी घाणेकर, विलक्षणा मोरे, धनश्री मणगुतकर, सुवर्णा व बालकलाकार संस्कृती कुंभार हे चंदगड तालुक्यातील विविध गावचे कलाकार जीवन कुंभार यांच्या दिग्दर्शनाखाली आपले अभिनय कौशल्य दाखवणार आहेत.
   यावेळी रणजित देसाई यांच्या कन्या पारू नाईक, मधुमती शिंदे, नातू गौरव नाईक व कुटुंबीय तसेच नाट्यविश्वातील दिग्गज मंडळी व मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. 
 रणजीत दादांच्या साहित्यावर प्रेम करणारे वाचक व मराठी नाट्य रसिकांना हे महानाट्य रंगभूमीवर पाहण्याची  मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. 
  नाट्यरसिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित महानाट्याचा आनंद लुटावा असे आवाहन 'नाट्यसंस्कार' च्या वतीने निर्माता शिवाजी पाटील, दिग्दर्शक जीवन कुंभार, ताम्रपर्णी प्रतिष्ठान कोवाडचे अध्यक्ष कृष्णा बामणे आदींनी केले आहे.




No comments:

Post a Comment