माणगाव येथे चंदगड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2022

माणगाव येथे चंदगड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक संपन्न

 


 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
 माणगाव (ता. चंदगड) चंदगड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटने मार्फत माणगाव येथे रविवारी बैठक पार पडली. या बैठकीला तालुक्यातील बहुसंख्य वृत्तपत्र एजंट उपस्थीत होते. या बैठकीला गडहिंग्लज तालुक्यातील प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते.
  या वेळी विक्रेत्यांच्या न्याय व हक्का बाबत सविस्तर चर्चा झाली. संघटना बळकट करणेसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी गडहिंग्लज ,आजरा ,चंदगड तालुक्यातील विक्रेत्यांनी पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार दि १० एप्रिल रोजी एस एस हायस्कुल नेसरी येथे दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.



No comments:

Post a Comment