केंद्र शाळा कोवाड येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देताना केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, आरोग्य सहायिका, व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक, शिक्षिका. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर यांच्यावतीने जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २५ मे रोजी जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड अंतर्गत येणाऱ्या ३० गावांतील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय तसेच घरोघरी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या निःशुल्क देण्यात आल्या.
मुलांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास कुपोषण आणि रक्तक्षय होऊन त्यांना सतत थकवा जाणवतो, त्यांची शारीरिक वाढ व विकास पूर्ण क्षमतेने होऊ शकत नाही. हे टाळून भावी पिढी सुदृढ व सशक्त बनवण्यासाठी शासनाच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून ही मोहीम राबवण्यात आली आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड चे सर्व अधिकारी, आरोग्य कर्मचारी, कोवाड, कालकुंद्री, कुदनुर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, नोडल शिक्षक यांनी अथक परिश्रम घेत आरोग्य केंद्र अंतर्गत ३० गावांतील एकूण ८१७२ नोंदणी कृत लाभार्थी मुलामुलींना गोळ्या दिल्या. हे आरोग्य विषयक महत्त्वाची मोहीम यशस्वी केली.
केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांच्या हस्ते मुलांना गोळ्या देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यवस्थापन समिती सदस्य इम्तियाज अल्लाखान, समिया वाडकर, आरोग्य सहाय्यिका सुनिता व्ही नाईक व रंजना साळुंखे, नोडल शिक्षिका कविता पाटील, मधुमती गावस, उज्जवला ने सरकर भावना प त वाडकर आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment