कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री, (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचा दहावा वर्धापनदिन उत्साहात पार पडला. यानिमित्त रांगोळ्या, वाचनालय नामफलक अनावरण, दशकपूर्ती अहवालाचे प्रकाशन, सन २०२१-२२ चे उत्कृष्ट वाचक सन्मानाचे वितरण आदी उपक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष शंकर कोले होते.
स्वागत विलास शेटजी, शिवाजी खवणेवाडकर, शिवाजी पाटील, वंदना पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा डॉ व्ही आर पाटील यांनी केले. यावेळी कृषी अधिकारी मनोहर पाटील, अनंत कृष्णा पाटील, हरिश्चंद्र पाटील, झेवियर क्रूज आदींची भाषणे झाली. नारायण गावडू पाटील, स्वराज विजय पाटील यांना उत्कृष्ट वाचक म्हणून तर कोवाड महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ व्ही आर पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. "दशकपूर्ती अहवाल" चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वर्षभरात विविध साप्ताहिक, दैनिके, पुस्तके व आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांचे मानपत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी सुरेश नाईक, विनायक कांबळे ,चंद्रकांत पाटील, दीपक कालकुंद्रीकर, युवराज पाटील, शंकर सांबरेकर, गजानन पाटील, प्रशांत कोकीतकर व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार पी एस कडोलकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment