नेसरीच्या एस एस हायस्कूलचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2022

नेसरीच्या एस एस हायस्कूलचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश

 

नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एस. एस. हायस्कूल मध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करताना डॉ.अ र्चनाताई कोलेकर,बाजूला प्राचार्य मटकर,लोहार, बुवा आदी

चंदगड / प्रतिनिधी
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एस. एस. हायसकूलच्या दोन विद्यार्थ्यां राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती करीता पात्र ठरले आहेत.
          राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी च्या शिष्यवृत्ती योजनेसाठी नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एस एस हायस्कूल मधील दोन विद्यार्थ्यांना ४८०००/- रू प्रत्येकी तर सारथी संस्था पुणे यांच्यामार्फत लक्षीत गटातील एकूण चौदा विद्यार्थी निवडले गेले आहेत, छ. राजाराम महाराज शिष्यवृती साठी एकूण चौदा विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यातील प्रत्येक विद्यार्थ्याला ३८०००/-रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.या सर्व विद्यार्थ्यांचा नुकताच हायस्कूल मध्ये   संस्थेच्या संचालिका सौ. डॉ. अर्चनाताई  कोलेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
          यावेळी  सेवानिवृत्त प्राचार्या शिप्पूरकर यांनी लिहिलेल्या  'कुसुमाग्रजांच्या कवितांचे  वर्तमान कालीन संधर्भ' याबद्दल गौरव करण्यात आला.कार्यक्रमाल प्राचार्य एस. आर. मटकर, पर्यवेक्षक एस. डी. लोहार, सामाजिक कार्यकर्ते सतीश बुवा, व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन एस. जे. कालकुंद्रीकर यांनी तर आभार लोहार यांनी मानले.


No comments:

Post a Comment