महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशिलकर यांच्या जीवनावारील रग तांबड्या मातीची... झुंज वाघाची!’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2022

महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशिलकर यांच्या जीवनावारील रग तांबड्या मातीची... झुंज वाघाची!’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन



तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मल्ल विष्णू जोशीलकर यांच्या जीवनावर आधारित ‘रग तांबड्या मातीची... झुंज वाघाची!’ या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार, दि. 17 रोजी आयोजित केला आहे. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे दुपारी साडेचार वाजता हा समारंभ होणार आहे.

पत्रकार पी. ए. पाटील आणि सदानंद पुंडपाळ यांनी या चरित्र ग्रंथाचे लेखन केले आहे. प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान पालकमंत्री सतेज पाटील भुषविणार आहेत. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार राजेश पाटील, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी अतिरिक्‍त कामगार आयुक्‍त आर.जी. पाटील,पंढरीनाथ तथा अण्णासाहेब पठारे, वीज कामगार महासंघाचे माजी अध्यक्ष अण्णाजी देसाई, मल्ल संभाजी वरुटे उपस्थित राहणार आहेत. 

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे यांच्या विशेष सहकार्यातून हे पुस्तक साकारलेे आहे. जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ, चंदगड तालुका मित्र मंडळ व महाराष्ट्र वीज कामगार  महासंघाने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.



No comments:

Post a Comment