जोरदार वादळाने पोल्ट्रीचे पत्रे फुटून पाच लाखांचे नुकसान, कोठे घडली घटना? - चंदगड लाईव्ह न्युज

16 April 2022

जोरदार वादळाने पोल्ट्रीचे पत्रे फुटून पाच लाखांचे नुकसान, कोठे घडली घटना?

शेवाळे येथे वादळी वाऱ्याने जमिनदोस्त झालेली संतोष गावडे यांची पोल्ट्री


तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

आज दि.१६ रोजी दुपारी जोरदार आलेल्या वादळाने शेवाळे ( ता. चंदगड ) येथील शेतकरी संतोष पांडूरंग गावडे यांच्या नवीन पोल्ट्रीचे सिमेंट पत्र्यासहीत छत कोसळून पडल्याने अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले .

      आज दुपारनंतर आलेल्या जोरदार वाऱ्याचा तडाखा संतोष गावडे यांच्या नवीन बांधलेल्या पोल्ट्रीला बसला . लाखो रुपये कर्ज काढून उभारलेली पोल्ट्री वाऱ्याने जमिनदोस्त केली . लोखंडी थाटासहीत ३८० पत्रे जमिनिवर कोसळून जमिनदोस्त झाले . सुदैवाने पोल्ट्रीत पक्षी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे . प्रशासनाने संबंधीत घटनेचा पंचनामा त्वरीत करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.







No comments:

Post a Comment