डॉ. शाहू गावडे लिखित `काजू उद्योगातील महिला कामगार` पुस्तकाचे शनिवारी चंदगड येथे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2022

डॉ. शाहू गावडे लिखित `काजू उद्योगातील महिला कामगार` पुस्तकाचे शनिवारी चंदगड येथे प्रकाशन

डॉ. शाहू धानू गावडे
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक डॉ. शाहू धानू गावडे (मुळ गाव – नांदवडे) लिखित `काजू उद्योगातील महिला कामगार` या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवार 23 एप्रिल 2022 रोजी चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या सेमीनार हॉलमध्ये दुपारी 12 वाजता होणार आहे. 

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील असतील. बेळगाव येथील शासकीय महिला महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रमेश मांगलेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सहा. पाध्यापक डॉ. पी. एम. शहापूरकर प्रमुख वक्ते आहेत. प्रकाशन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. शाहू गावडे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment