|
चंदगड येथील र भा माडखोलकर महाविद्यालयात जागर जाणिवांचा अभियानांतर्गत आयोजित कार्यशाळेत बोलताना सौ. संजना लोहार, बसलेले प्राचार्य पाटील. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करावी. बदलत्या युगाची गरज म्हणून अनेक क्षेत्रात करिअर करण्यास वाव आहे. प्रतिकूल परिस्थितीत ही कौशल्ये निश्चित उपयुक्त ठरतील" असे प्रतिपादन संजना प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका सौ. संजना लोहार यांनी केले.
|
चंदगड येथील र भा माडखोलकर महाविद्यालयात जागर जाणिवांचा अभियानांतर्गत आयोजित कार्यशाळेत विद्यार्थिनीवर प्रात्यक्षिक दाखविताना सौ. लोहार |
त्या र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील जागर जाणिवांचा अभियानांतर्गत आयोजित कार्यशाळेत बोलत होत्या. अध्यक्षस्थानावरून प्रा. डॉ. पी. एल. भादवणकर यांनी कौशल्ये अपरिहार्य असल्याचे मत व्यक्त केले. समन्वयक प्रा. डॉ. आर. ए. कमलाकर यांनी कार्यशाळेचा हेतू विशद केला. निकिता गावडे हिने सूत्रसंचालन तर
तेजस्विनी तुपटने आभार मानले. यावेळी सौ. लोहार यांनी कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थिनीना वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवली.
No comments:
Post a Comment