कागणी : सी. एल. वृत्तसेवा
मूळचे निट्टुर (ता. चंदगड) व सध्या भांदुर गल्ली, बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वासराव विठठलराव चव्हाण-पाटील (वय ६४) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी दि. १३ मे रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. चंदगड येथील काँग्रेसचे गटनेते व गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विक्रम चव्हाण- पाटील यांचे ते काका होत. तर पुणे येथील निवृत्त विंग कमांडर प्रतापराव चव्हाण-पाटील, महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे निवृत्त मुख्य अभियंता गुलाबराव पाटील यांचे ते बंधू होत. अंत्यसंस्कार रविवारी सकाळी १० वाजता बेळगाव येथील सदाशिवनगर स्मशानभूमी येथे होणार आहेत.
No comments:
Post a Comment