चंदगड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर, वाचा कोणाची झाली निवड....... - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2022

चंदगड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर, वाचा कोणाची झाली निवड.......


संजय कुट्रे (अध्यक्ष)

रवळू पाटील (खजिनदार)
                                   

मारुती बेनके (खजिनदार)

विष्णू पाटील (सचिव)

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
              चंदगड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. पाटणे फाटा येथे पार पडलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.  अध्यक्षपदी संजय कुट्रे (किणी), उपाध्यक्षपदी रवळू पाटील (तांबुळवाडी), सचिव विष्णू पाटील (नागरदळे), खजिनदारपदी मारुती बेनके (माणगाव) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी सदस्य म्हणून अरविंद भातकांडे (सुंडी), काशिनाथ जाधव (कोवाड), अजय फाटक (चंदगड), रवींद्र शिंदे ( शेनोळी ), रुपेश गवस(हेरे), जॉनी फर्नाडिस (मौजे कार्वे), मारुती मिसाळ (नागनवाडी), अमृत मोरे (तुर्केवाडी), संदीप बांदेकर (कानूर) यांचा समावेश आहे. 
          यावेळी संजय रजपूत (चंदगड), प्रकाश इंगवले (अडकुर), सुधीर मांजरेकर (कार्वे ), सुभाष गावडे (हलकर्णी), जोतिबा मांडेकर (कुदनूर), रामा कांबळे (माणगाव), परशराम पाटील (शेनोळी), पुंडलिक भोसले (महीपाळगड), रमेश पाटील (कडलगे बुद्रुक), राजू पाटील (ढोलगरवाडी), रामा सुतार(दुडुंगे), बळवंत थोरवत (लकीकट्टे), जॉनी फर्नाडिस (मौजे कiर्वे), सुधीर मांजरेकर (शिवणगे), अजित पाटील (म्हाळेवाडी), रामा सलाम (घुल्लेवाडी), वाकोबा चव्हाण (करेकुंडी), अब्दुल्ल मुल्ला (चंदगड), विशाल गुंडप (मांडेदुर्ग), आदी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment