बेळगाव कवीसंमेलनाध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची निवड, रविवारी होणार मराठी साहित्य संमेलन - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2022

बेळगाव कवीसंमेलनाध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची निवड, रविवारी होणार मराठी साहित्य संमेलन

संमेलनाध्यक्ष शिवाजी शिंदे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे.

    या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार  असून दुसऱ्या  सत्रात निमंत्रितांचे काव्य संमेलन होणार असून या कवीसंमेलनाध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती अभामसा परिषदचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील व जिल्हाध्यक्ष  अॅड. सुधीर चव्हाण  यांनी दिली.

               बेळगाव जिल्हयातील नवोदित कवींना व्यासपीठ मिळावे यासाठी    या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी शिंदे हे  मागील २५  वर्षपासून कविता लेखन करीत असून त्यांचे  हिरवे गाणे हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. या काव्यसंग्रहाला  कोल्हापूर येथील न. ना. देशपांडे पुरस्कार,  कवी अविनाश ओगले स्मृती प्रथम पुरस्कार मिळाला आहे. या शिवाय कोल्हापूर येथे झालेल्या दमसा संमेलनात कवी संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे. कुद्रेमनी येथे बलभीम साहित्य संघातर्फे १५ वर्षे साहित्य संमेलनाचे  आयोजन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यवतीने कुद्रेमनी येथे दोन साहित्य संमेलने व एक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. विविध नियतकालिके व दिवाळी अंकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment